तो गज हलवू लागला. जोरजोरात. सावित्री घाबरली. ' हा काय प्रकार आहे. हा असं का करतोय ? ' ती एकटक समशेरकडे बघत राहिली आणि काही वेळात खिडकीचा एक गज खिडकीपासून वेगळा झाला. अशक्य ! एकदम अशक्य ! आपण हे काय बघतोय ? ते सावित्रीला कळेना. हळूहळू दुसरा गज सुद्धा खिडकीपासून वेगळा झाला. म्हणजे हा बाहेर जातो की काय ! बापरे ! आणि समशेर खिडकीत चढला. सावित्रीने भरपूर प्रयत्न केला त्याला थांबवण्याचा , पण व्यर्थ ! तो खिडकीतून बाहेर पळाला व अंधारात नाहीसा झाला.