आणि तिच्या डोक्यावर हात ठेवला. निधीला पहिले काही जाणवलं नाही पण हळूहळू तिच्यातील शक्ती क्षीण होत गेली, तिला ग्लानी यायला लागली , केसांचा रंग बदलायला लागला. शरीराची स्किन लूज पडायला लागली , डोळ्यांची, कानांची शक्ती क्षीण होत गेली !
काही वेळापूर्वी तरणीताठी असलेली निधी आता एका वृद्ध स्त्री मध्ये रूपांतरित झाली होती !
अत्यंत वृद्ध स्त्री !
आणि राणी सरकारचं तेज प्रचंड वाढलं होतं !
तरीही त्यांनी निधीच्या निधीच्या डोक्यावरील हात काढला नाही !
थोड्याच वेळात तिथे अस्थी पंजर दिसायला लागलं ! तरीही राणी सरकारने हात काढला नाही. काही वेळात तिथे काहीही उरलं नाही. निधीला राणी सरकारने पूर्ण नष्ट केलं होतं. अगदी कणभर ही सुटलं नव्हतं !